मुंबई : खरे तर दक्षिण मुंबई हा शिवसेनेचा ग्रास रूट वर बालेकिल्ला म्हणून गणला जात असला तरी येथे 2014 साली शिवसेना भाजपा मित्र पक्षाच्या एन डी ए ला नरेंद्र मोदींच्या करिष्म्यावर पहिल्यांदाच शिवसेनेच्या अरविंद सावंत यांना मिलिंद देवरा या बलाढ्य काँग्रेस नेत्याचा पराभव करता आला. पुन्हा मोदींच्याच जादूवर 2019 साली अरविंद सावंत हे पुन्हा दुसऱ्यांदा खासदार झाले.आता शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेली आणि याच शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई लोकसभेची उमेदवारी विद्यमान महिला आमदार
यामिनी जाधव देण्यात आल्याने या लढाईला खरी रंग्गत आली आहे.
यामिनी जाधव या भायखळा विधानसभेच्या विद्यमान आमदार आहेत.त्यांना
दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा महायुतीने केली आहे.
आमदार यामिनी जाधव या दक्षिण मुंबईत खासदार अरविंद सावंत यांना तोडीस तोड लढत देतील.अरविंद सावंत हे महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने या ठिकाणी यामिनी जाधव यांना उमेदवारी दिल्याची पोस्ट शिवसेनेने एक्स वरुन करीत हि माहिती दिली.
येथून उमेदवारी मिळावी म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपनगर पालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आपापल्या परीने चांगलीच फिल्डिंग लावली होती मात्र येथे शिवसेना एकनाथ शिंदे गटाने बाजी मारत उमेदवारी खेचून आणली आणि ती आमदार यामिनी जाधव यांना मिळाली.एक वेळच्या नगरसेविका असलेल्या यामिनी जाधव यांचा राजकिय पायगुण हा विजयाची मालिका कायम ठेवणारा असून त्यांनी पहिल्याच फटक्यात महिला नगरसेविका म्हणून माझगांव प्रभाग क्र 207 यांनी विजयश्री मिळविली तर 2018 साली त्यांनी भायखळा विधानसभेचे तत्कालीन एम आय एम चे आमदार वारीस पठाण यांना पराभूत करून शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदाच भायखळयाच्या आमदार होण्याचा बहुमान मिळाला. यावेळी शिवसेना विरोधात शिवसेना अशी लढत असल्याने लोहे को लोहा काटता है अशीच चर्चा शिवसैनिकांत सुरु असून हि लढत मुंबईतील अन्य लढती पैकी आकर्षनाचे एक केंद्र बिंदू ठरणार आहे असे एक कट्टर शिवसैनिक किशोर गायकवाड यांनी म्हटले.