- आमदार सत्यजीत तांबेंनी व्यक्त केली भावना
- ‘आदर्श युवा आमदार सन्मान २०२४’ पुरस्काराने सन्मानित
आदर्श युवा आमदार पुरस्काराने आ. तांबेंना गौरविले!
- आ. सत्यजीत तांबेंनी युवकांना केले संबोधित
- युवकांचा सहभाग हा निवडणूक लढण्यापुरता मर्यादित नसावा
पुणे:लोकशाहीचा महाकुंभ मेळा हा २०२४ या वर्षात भरणार आहे. १२७ पैकी ६४ देशात निवडणूक होणार आहेत. जगात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. लोकशाहीच्या उत्सवात युवकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. युवकांचा सहभाग हा निवडणूक लढण्यापुरता मर्यादित नसून आपण राजकीयदृष्ट्या गंभीर कसे होऊ शकतो, याकडेही लक्ष दिले पाहिजे. राजकारणात युवकांनी सतर्क राहिले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबेंनी केले.
१३ वी भारतीय छात्र संसद गव्हर्निंग कौन्सिल आयोजित ‘आदर्श युवा आमदार सन्मान – २०२४’ कार्यक्रम बुधवारी पार पडला. पुणे येथील कोथरूड मधील एमआयटी-डब्ल्यूपीयुच्या स्वामी विवेकानंद सभा मंडपात कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आमदार सत्यजीत तांबेंना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ते तांबे बोलत होते.
सत्यजीत तांबे म्हणाले की, आज मला खूप आनंद होताय की, एमआयटीमध्ये मला आदर्श युवा विधायक सन्मान – २०२४ चा पुरस्कार दिला जात आहे. याच एमआयटीने विद्यार्थी राजकारणामध्ये प्रवेश दिला होता. एमआयटी ही एक व्हायब्रंट संघटना आहे. इथूनच माझ्या विद्यार्थी राजकारणाला सुरुवात झाली. एनएसयुआय, युथ काँग्रेस ते आमदार पदापर्यंत पोहोचलो. एमआयटी हे माझं कुटुंब आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.