उत्तर मुंबईतील महिलांसाठी विशेष उपक्रमांतर्गत महिला सशक्तीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कांदिवली पूर्वेकडील आकुर्ली रोड येथील कौशल्य विकास केंद्र येथे रविवारी शिबिर पार पडले.शिबिरात, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, एलआयसी बीमा सखी योजना, स्वनिधी से समृद्धी महिला स्वयं सहायता गट, महिला कौशल्य प्रशिक्षण या योजनांची महिलांना माहिती देण्यात आले. हे प्रशिक्षण महिलांना विनामूल्य होते. यावेळी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी महिलांना मार्गदर्शन केले.