आज महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी च्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न स्व. राजीव गांधी जी यांच्या स्मृतिदिना निमित्त कूपरेज मैदान, चर्चगेट येथे स्व. राजीव गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नमन केले. स्व. राजीवजी यांनी देशासाठी केलेले कार्य आणि त्याग अतुलनीय आहे. हे कार्य सदैव आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले आणि मा. मंत्री – महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम ) खान व इतर कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते, महिला कॉँग्रेस ,तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.