अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश, देवेंद्र फडणवीस म्हणाले; “आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस कारण..”

0
1

आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. आत्तापर्यंत जे काही झालं ते झालं. आता मी माझ्या राजकीय कारकिर्दीची नवी सुरुवात करतो आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं. आज त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. सोमवारपर्यंत काँग्रेसमध्ये असलेले अशोक चव्हाण यांनी सोमवारीच आपल्या आमदारकीचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रवेशाबाबत भाष्य केलं नव्हतं. आज अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती भाजपात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“आज आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातलं एक ज्येष्ठ नेतृत्व आमच्याकडे आलं आहे. देशाची लोकसभा आणि विधानसभा गेली अनेक वर्षे ज्यांनी गाजवली. विविध मंत्रिपदं ज्यांनी भुषवली आणि दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली असे अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करत आहेत. मी सर्वात आधी भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती यांना अशोक चव्हाण यांचा प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म आहे त्यावर सही करुन त्यांना भाजपात प्रवेश द्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here