ॲड. सुशीबेन शहा यांच्यावर शिवसेनेने सोपवली दुहेरी जबाबदारी

0
0
  • महिला सेनेच्या मुंबई शहर समन्वयकपदी नियुक्ती
  • ⁠शिवसेनेच्या प्रवक्तेपदाचीही जबाबदारी

कुशल संघटक, धडाडीने काम करणारी महिला नेता, अशी प्रतिमा असलेल्या ॲड. सुशीबेन शहा यांच्यावर शिवसेनेने दुहेरी जबाबदारी सोपवली आहे. काही काळापूर्वी शिवसेनेचा भगवा हाती घेतलेल्या ॲड. सुशीबेन शहा यांनी अल्पावधीत आपली उपयुक्तता सिद्ध केल्याने त्यांची नियुक्ती शिवसेना महिला सेनेच्या मुंबई शहर समन्वयकपदी करण्यात आली. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत हिंदी आणि इंग्रजी भाषिक प्रवक्ता ही जबाबदारीचाच त्यांच्यावर सोपवली आहे.

स्वतः ॲडव्होकेट असलेल्या सुशीबेन शहा यांनी आतापर्यंत महिलांचे व लहान मुलांचे सक्षमीकरण, मुंबईतील मोकळ्या जागा, शिक्षण, अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी केली आहे. त्या स्वतः उद्योजिका असून महिला उद्योजकांसाठी सुरक्षित आणि सोयीचा वातावरण तयार करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे.

आता पक्षाने त्यांच्यावर मुंबईतील महिला सेनेच्या समन्वयक पदाची जबाबदारी सोपवली आहे. शहरातील नोकरदार महिलांच्या समस्यांकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. तसंच मुंबईत अनेक महिला छोटेमोठे उद्योग करतात. त्यांच्यासाठीही भरीव काम करण्याचा मानस असल्याचं ॲड. सुशीबेन शहा यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना पक्ष हा हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण पुढे नेणाऱ्या या पक्षाचे विचार जनमानसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रवक्ता म्हणून मी करेन, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

माझ्यावर दुहेरी जबाबदारी सोपवताना मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथजी शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. मुख्यमंत्र्यांचे विचार आणि महायुतीच्या लोकोपयोगी योजना घराघरात पोहोचवण्यासाठी मी जीवाचं रान करेन. या योजनांमुळे राज्यातील महिलांना नवीन शक्ती, नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल, याची जबाबदारी मी समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया अॅड. सुशीबेन शहा यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here