(लिफ्टचा अपघात होणे)*

0
2

*( घटनास्थळी ०१ व्यक्ती जखमी व ०६ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.)*

आज दिनांक १०/०९/२०२३ रोजी १७:३५ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार *(घटनेची माहिती देणारे:- बाळकुम अग्निशमन केंद्र) रुणवाल कॉम्प्लेक्स, बाळकूम, ठाणे (प.) याठिकाणी आयरीन बिल्डिंगच्या (तळ + ४० मजली बांधकाम सुरु असलेली इमारत + भूमिगत ०३ मजली पार्किंग) चाळीसव्या मजल्यावर लिफ्टचा रोप तुटल्याने अपघात होऊन सदर लिफ्ट भूमिगत पार्किंगच्या बेसमेन्ट मध्ये कोसळली असून ०७ कामगार अडकले होते. *सदर घटनास्थळी मा. उपायुक्त सो., मा. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान ०१ – इमर्जन्सी टेंडर व ०७ – रुग्णावाहिकांसह उपस्थित होते.*

*घटनास्थळी ०७ – कामगारांना अपघात ग्रस्त लिफ्ट मधून बाहेर काढण्यात आले असून त्यातील ०६ – कामगार मृत व ०१- कामगार जखमी अवस्थेत होता. जखमीला उपचाराकारिता निपुण रुग्णालय, ठाणे याठिकाणी पाठविण्यात आले आहे व मृतांना जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे पुढील कार्यवाही करिता पाठविण्यात आले आहे.

*जखमींची नावे खालीलप्रमाणे :-*

*१)* श्री. सुनिल कुमार दास (पु / वय २१ वर्षे )

*मृतांची नावे खालील प्रमाणे :-*

*१)* महेंद्र चौपाल (पु / वय ३२ वर्षे )

*२)* रुपेश कुमार दास (पु / वय २१ वर्षे )

*३* हारून शेख (पु / ४७ वर्षे )

*४* मिथलेश (पु / ३५ वर्षे )

*५)* कारिदास (पु / ३८ वर्षे )

*६)* अज्ञात (पु)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here