- पक्षविरोधी कारवाईबद्दल २३ सदस्यांचं निलंबन
- दक्षिण मुंबईतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासह बैठका
- मुंबई काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांचा झपाटा
काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षत्याग केल्यानंतर मुंबई काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी रविवारी संध्याकाळीच देवरा यांच्यासह शिंदे गटात जाणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचे आदेश काढले. त्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दक्षिण मुंबईतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह प्रा. वर्षा गायकवाड यांनी वैयक्तिक संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. विशेष म्हणजे देवरांसारखा बडा नेता जाऊनही ३०० पेक्षा जास्त कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात गर्दी करत दक्षिण मुंबई अजूनही काँग्रेससोबतच असल्याची ग्वाही दिली.
मिलिंद देवरा यांच्यासोबत दक्षिण मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद मांद्रेकर, माजी नगरसेविका सुशीबेन शहा, सुनील नरसाळे, रामबच्चन मुरारी, हंसा मारू, अनिता यादव हे माजी नगरसेवक, दक्षिण मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष रमेश यादव, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश राऊत आणि अॅड. त्र्यंबक तिवारी यांच्यासह २३ पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या २३ जणांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी रविवारी रात्रीच त्यांचं निलंबन केलं.
मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयात गर्दी
दक्षिण मुंबईतील एका नेत्याने पक्षत्याग केल्यामुळे काँग्रेस खचेल, ही विरोधकांची समजूत चुकीची असल्याचं सोमवारी मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने सिद्ध केलं. सोमवारी सकाळी असलेल्या दक्षिण मुंबईतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या बैठकीसाठी ३५० पेक्षा जास्त जण एकत्र आले होते. यात आमदार अमीन पटेल, ज्येष्ठ नेते भवरसिंह राजपुरोहित, पालिकेतील माजी विरोधी पक्षेनेते ज्ञानराज निकम, किशन जाधव, अश्फाक सिद्दीकी, पूरन दोशी आदी नेत्यांचा समावेश होता. आम्ही कायम काँग्रेससोबतच आहोत आणि कायम राहू. जे गेले त्यांच्यामुळे पक्षाची ताकद अजिबात कमी होणार नाही. आम्ही जोमाने पक्षवाढीसाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करू, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षांसोबत थेट संवाद
या बैठकीदरम्यान मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करत शेवटच्या श्वासापर्यंत आपण काँग्रेसमध्ये आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणार असल्याचा विश्वास दिला. तसंच त्यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील कार्यकर्त्यांशी एक-एक करून दिवसभर संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसंच सर्व कार्यकर्त्यांना पक्षाकडून हवं ते पाठबळ मिळेल, अशी ग्वाही या वेळी प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी दिली. या वेळी कार्यकर्त्यांनीही पदाची अपेक्षा न ठेवता पूर्वीपेक्षा अधिक जोमाने पक्षासाठी काम करू, असा विश्वास व्यक्त केला.
ते लोक होते वेगळे…’
पक्ष आणि विचारधारा यांच्याशी प्रामाणिक राहून काम करणारे लोक यशस्वी होतात. दुर्दैवाने मिलिंदजींनी पक्षाशी आणि विचारधारेशीही फारकत घेतली. पण एक व्यक्ती सोडून गेल्याने ना पक्ष खिळखिळा होत ना विचारधारा कमकुवत होत! उलट त्यामुळे मला आणि असंख्य कार्यकर्त्यांना काम करायला बळ मिळालं आहे. सुरेश भटांचा एक शेर या वेळी मला आठवतोय, ‘ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे… मी वाट थांबून पाहतो, मागे किती जण राहिले?’ हे मागे राहिलेले लोक सच्चे काँग्रेसी आहेत आणि तेच आम्हाला विजयपथावर घेऊन जातील.
मुंबई कांग्रेस ने पार्टी विरोधी गतिविधियों के लिए 23 सदस्यों को निलंबित किया
- ”सिर्फ एक व्यक्ति के चले जाने से न तो पार्टी कमजोर होती है और न ही उसकी विचारधारा”: वर्षा गायकवाड़
- मुंबई कांग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड़ ने दक्षिण मुंबई में कार्यकर्ताओं और अधिकारियों के साथ बैठकें कीं
- मिलिंद देवड़ा के पार्टी छोड़ने के बाद कांग्रेस ने आक्रामक रुख अपना लिया है
15 जनवरी 2024
रविवार को मिलिंद देवड़ा के कांग्रेस पार्टी छोड़ने के बाद मुंबई प्रदेश कांग्रेस कमेटी (एमआरसीसी) ने पार्टी विरोधी गतिविधियों के चलते 23 सदस्यों को पार्टी से निलंबित कर दिया है। मिलिंद देवड़ा के साथ जाने और शिंदे गुट में शामिल होने के बाद एमआरसीसी अध्यक्ष प्रोफेसर वर्षा गायकवाड़ ने कांग्रेस पदाधिकारियों को निलंबित करने का आदेश दिया।
हालाँकि, देवड़ा के पार्टी छोड़ने के बावजूद, मुंबई कांग्रेस कार्यालय दक्षिण मुंबई जिले के 300 से अधिक कार्यकर्ताओं से भर गया और कांग्रेस की वफादारी को आश्वस्त किया। गायकवाड़ ने पूरे सोमवार मुंबई स्थित मुंबई कांग्रेस कार्यालय में पदाधिकारियों के साथ बैठकें कीं।
“जो लोग पार्टी और विचारधारा के प्रति वफादार होते हैं वे सफल होते हैं। दुर्भाग्य से, मिलिंदजी ने पार्टी और विचारधारा से भी नाता तोड़ लिया। हालांकि, सिर्फ एक व्यक्ति के चले जाने से न तो पार्टी कमजोर होती है और न ही उसकी विचारधारा! इसके विपरीत, इसने मुझे और कई कार्यकर्ताओं में कड़ी मेहनत करने की ताकत होती है। मुझे सुरेश भट का एक उद्धरण याद है, जिसमें उन्होंने कहा था, ‘वे लोग अलग थे, वे जल्दबाजी में आगे निकल गए… मैं खड़ा हो कर देखता हूं, कितने लोग पीछे रह गए?’ यह लोग जो पीछे है वह सच्चे कांग्रेसी है और यह हमें जीत की ओर ले जायेगी।”
मुंबई कांग्रेस ने जिन 23 लोगों को निलंबित किया है उनमें दक्षिण मुंबई जिला अध्यक्ष प्रमोद मांद्रेकर, पूर्व नगरसेवक सुशीबेन शाह, सुनील नरसाले, रामबचन मुरारी, हंसा मारू, पूर्व नगरसेविका अनिता यादव, दक्षिण मुंबई कांग्रेस के कार्यकारी अध्यक्ष रमेश यादव, मुंबई कांग्रेस महासचिव प्रकाश राउत और एडवोकेट त्र्यंबक तिवारी सहित अन्य शामिल हैं। गायकवाड़ ने रविवार रात सभी 23 लोगों को निलंबित कर दिया। Ji
गायकवाड़ ने सोमवार को एक बैठक की जिसमें 350 से ज्यादा लोग इकट्ठा हुए. वरिष्ठ कांग्रेस नेता जैसे विधायक अमीन पटेल, वरिष्ठ नेता भवरसिंह राजपुरोहित, बीएमसी में विपक्ष के पूर्व नेता ज्ञानराज निकम, किशन जाधव, अशफाक सिद्दीकी, पूरन दोशी और अन्य।
बैठक के दौरान गायकवाड़ ने पार्टी कार्यकर्ताओं को संबोधित किया और उन्हें आश्वासन दिया कि नेता अंतिम सांस तक कांग्रेस और उसके कार्यकर्ताओं के साथ कंधे से कंधा मिलाकर खड़े रहेंगे। उन्होंने पूरे दिन जिले के विभिन्न तालुकाओं के कार्यकर्ताओं से एक-एक करके बातचीत की और उनकी समस्याओं के बारे में जाना। गायकवाड़ ने पार्टी से पूर्ण समर्थन का आश्वासन दिया और पार्टी कार्यकर्ताओं ने भी कांग्रेस में विश्वास जताया और और अधिक तीव्रता से काम करने की कसम खाई।
Mumbai Congress Suspends 23 Members for Anti-Party Activities
- “Just because one person leaves, neither the party nor its ideology weakens”: Varsha Gaikwad
- MRCC President Varsha Gaikwad lined up meetings with workers and officials in South Mumbai
- Congress takes an aggressive stance after Milind
Mumbai Regional Congress Committee (MRCC) has suspended 23 members from the party on grounds of anti-party activities after Milind Deora’s exit on Sunday. MRCC President Prof. Varsha Gaikwad ordered the suspension of Congress office-bearers after they went with Milind Deora and joined the Shinde faction.
However, despite Deora quitting the party, the Mumbai Congress office was filled with more than 300 workers from the south Mumbai district and reassured Congress loyalty. All through Monday, Gaikwad conducted meetings with office bearers in the Mumbai Congress office in Mumbai.
“People who are loyal to party and ideology succeed. Unfortunately, Milindji parted ways with the party and the ideology as well. However, just because one person leaves, neither the party nor its ideology weakens! On the contrary, it has given me and many workers the strength to work harder. I remember a quote by Suresh Bhat who said, ‘Those people were different, those went ahead in haste… I waited and saw, how many people stayed behind?’ said Gaikwad.
The 23 people suspended by Mumbai Congress included South Mumbai District President Pramod Mandrekar, former corporators Sushiben Shah, Sunil Narsale, Rambachan Murari, Hansa Maru, former corporators Anita Yadav, South Mumbai Congress Working President Ramesh Yadav, Mumbai Congress General Secretary Prakash Raut, and Adv. Trimbak Tiwari among others Gaikwad suspended all 23 people on Sunday evening.
Gaikwad held a meeting on Monday where more than 350 people gathered. Senior Congress leaders such as MLA Amin Patel, senior leader Bhawarsinh Rajpurohit, former Leader of Opposition in BMC Gyanraj Nikam, Kishan Jadhav, Ashfaq Siddiqui, Puran Doshi and others.
During the meeting, Gaikwad addressed the party workers and assured them that leaders would stand shoulder to shoulder with Congress and its cadres till her last breath. She also interacted with workers from various talukas of the district one by one throughout the day and learned about their problems. Gaikwad assured complete support from the party and party workers, too, expressed belief in Congress and vowed to work more intensely.