महिलांवर अत्याचार करणारे हे मोदी सरकार आहे का? विद्याताई चव्हाण यांचा प्रश्न
मुंबई-मणिपूरमध्ये हिंसक जमावाने दोन महिलांना नग्न करून धिंड काढण्याचे क्रूर कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मणिपूर मध्ये गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे मात्र याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे महिलांविरोधात देशातील मोदी सरकार सुरक्षा देण्यात आणि रक्षण करण्यास अपयशी ठरले आहे तसेच देशात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराची घटना वाढ झाली असल्याने मोदी सरकार ही महिलांवरती अत्याचार करणारे सरकार आहे का? असा राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष विद्याताई चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात बेटी बचाव बेटी पढाव मात्र मणिपूरमध्ये याउलट होताना दिसत आहे मणिपूरमध्ये दोन महिलांची धिंड काढण्यात आली आहे मात्र 70 दिवस पहिले झालेल्या या घटनेत अद्यापही ही घटना सोशल मीडियावर समोर येईपर्यंत आणि सर्वोच्च न्यायालयाने यात दखल घेईपर्यंत कुठलेही कारवाई करण्यात आली नव्हती मणिपूरमध्ये भाजप ची सरकार आहे या ठिकाणी या दोन महिलांवर अत्याचार झाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंदर्भात कुठलेही वक्तव्य केले नव्हते देशांमध्ये महिला वर मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढले आहे. भाजपचे खासदार असलेले ब्रिजभूषण सिंह यांनी देखील कुस्तीपटू महिलेवर लैंगिक अत्याचार केले आहे मात्र त्यावर देखील कुठलीही कारवाई अद्याप भारतीय जनता पार्टीने केलेली नाही आहे. महिलांवरती अत्याचार करणारे हे मोदी सरकार आहे का? असा प्रश्न देशातील आणि महाराष्ट्रातील महिलांना पडला आहे असे प्रसार माध्यमांशी बोलताना विद्याताई चव्हाण यांनी म्हटले आहे.देशातील डबल इंजन मोदी सरकार हे महिलांवर होत असलेल्या अत्याचार रोखण्यात पूर्णपणे निषफळ ठरलं आहे. मणिपूर हे भरतातील राज्य आहे हे मोदींना लक्षात आहे?. मणिपूरमध्ये होत असलेल्या अशा घटने वेळी गृहमंत्री अमित शाह कुठे आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष तसेच खासदार सुप्रियाताई सुळे या आवाज उचलणारचं आहे परंतु आम्ही या घटनेच्या निषेधार्थ आज आंदोलन करत आहोत असे देखील विद्याताई चव्हाण यांनी म्हटले आहे.महाराष्ट्रा मध्ये देखील मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार वाढले आहे तसेच मुली बेपत्ता झाल्याच्या घटनेत देखील वाढ झाली आहे मात्र तरी देखील सभागृहामध्ये यावर कुणी बोलत नाही. महिलांवरील या घटना कधी थांबणार असा आम्ही देशातील गृहमंत्री आणि राज्यातील सरकारला प्रश्न विचारत आहे. असे विद्याताई चव्हाण यांनी म्हटले आहे.मणिपूर येथे झालेल्या महिला अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले यावेळी मुंबई महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.