- TASच्या विद्यार्थ्यांकडून बाल पुस्तक प्रकाशन महोत्सवाचे आयोजन
- विद्यार्थ्यांनी संशोधन करून केले लेखन
प्रतिनिधी पुणे,
पुण्याच्या द अकॅडमी स्कुल (TAS) विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना प्रगल्भ करण्याचा आणि त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असते. नुकतेच विद्यार्थ्यांनी बाल पुस्तक प्रकाशन महोत्सवाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये नर्सरी ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर संशोधन करून पुस्तके लिहिली.
विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बाल पुस्तक प्रकाशन महोत्सवाची कल्पना द अकॅडमी स्कुलच्या सीईओ डॉ. मैथिली तांबे यांची होती. विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला आणि संशोधन वृत्तीला वाव देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बाल पुस्तक प्रकाशन महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनेक विषयांवर संशोधन करून आपल्या संकल्पना उलगडण्याचा प्रयत्न केला. शिवाय, विद्यार्थ्यांनी कात्री, गोंद आणि सामान्य साहित्याचे कलाकृतींमध्ये रूपांतर करून पुस्तकांसाठी सजावटीचे मुखपृष्ठही तयार केले.
या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना शक्तीचा वापर करण्यासाठी पूर्ण स्वायत्तता आणि स्वातंत्र्य देण्यात आले होते. संकल्पनेतून अंमलबजावणीपर्यंत, विद्यार्थ्यांनी पुस्तक निर्मिती प्रक्रियेच्या प्रत्येक पैलूचा अभ्यास केला. या अनुभवातून, त्यांना कथाकथनाचा आनंद, संशोधन आणि त्यांच्या कल्पनांना मूर्त स्वरूप आल्याचे समाधान मिळाले. विद्यार्थ्यांनी त्यांचं लेखन समवयस्क, शिक्षक आणि कुटुंबांसोबत शेअर केली, ज्याद्वारे त्यांना आणखी प्रोत्साहन मिळाले. तसेच या सगळ्यातून त्यांना शिकण्यासाठी आणि अभिव्यक्तीचे नवीन मार्ग शोधण्यासाठी मदत होईल. असे डॉ. मैथिली तांबे म्हणल्या.