आकर्षक ब्रँड्सवर ५० टक्क्यांपर्यंत सूट
मुंबई:भारतातील सर्वात मोठा रिटेल प्लॅटफॉर्म असलेल्या नेक्सस सिलेक्ट मॉल्स यांनी त्यांच्या खास ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा केली. विशेष म्हणजे नवी मुंबईचं आकर्षण असलेल्या नेक्सस सीवूड्स मॉलमध्येही हा सेल शुक्रवार २४ नोव्हेंबर ते रविवार २६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. या तीन दिवसांत वेगवेगळ्या आकर्षक ब्रँड्सवर ५० टक्क्यांपर्यंत सूट असेल. अधिकाधिक ग्राहकांनी या सेलचा लाभ घ्यावा, असं आवाहन नेक्सस सीवूड्सच्या व्यवस्थापनाने केलं आहे.
सीवूड्स स्टेशनमध्येच असलेला नेक्सस सीवूड्स हा मॉल नवी मुंबईचं आकर्षण मानलं जातं. दिवाळी असो किंवा नवीन वर्षाचं स्वागत, ओणम् असो किंवा पोंगल आणि प्रजासत्ताक दिन असो किंवा स्वातंत्र्य दिन प्रत्येक सणासुदीच्या काळात नेक्सस सीवूड्सतर्फे आपल्या ग्राहकांसाठी विविध आकर्षक योजना आणि उपक्रम राबवण्यात येतात. ग्राहकांना खरेदीपलीकडे एक उत्तम अनुभव मिळावा, यासाठी नेक्सस सीवूड्स मॉल नेहमीच प्रयत्नशील असतो. या ब्लॅक फ्रायडे सेलदरम्यानही नेक्सस सीवूड्समधील ५० पेक्षा जास्त ब्रँड्सनी जवळपास ५० टक्क्यांपर्यंत सूट जाहीर केली आहे. तसंच नवी मुंबईकरांसाठी मॉल हे तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
मुंबईत आता मस्त थंडी सुरू होईल. त्याआधी तुमचा वॉर्डरोब खास थंडीच्या कपड्यांसाठी तयार करायला हवा. त्याशिवाय नंतर येणारा नाताळ आणि नवीन वर्ष यासाठीही तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी भेटवस्तू घ्यायच्या असतील, तरी ही उत्तम संधी आहे.