मुंबई/प्रतिनिधि : आज जोगेश्वरी पूर्व येथील इस्माईल यूसुफ महाविद्यालय येथे कॉँग्रेस तर्फे नीट परीक्षेच्या पेपर फूटीच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. नीट परीक्षेत होत असलेल्या व्यापक भ्रष्ट्राचारांमुळे पेपर फुटून लाखों-करोडो विद्यार्थ्यांचे भविष्य खराब करण्याचे काम केंद्रातील व राज्यातील सरकार करत असल्याचा आरोप माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांनी मोर्चाच्या वेळी केला.
नसीम खान पुढे म्हणाले की, आज संपूर्ण देशभरात विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. कॉँग्रेस नेते राहुल गांधी व अखिल भारतीय कॉँग्रेस अध्यक्ष मालिकार्जुन खरगे यांनी नीट परीक्षेत होत असलेल्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध आवाज उचलला असून त्यांनी ह्या भ्रष्ट व्यवस्थेची चौकशी करून त्वरित कार्यवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच UGC ची NET च्या परीक्षेत झालेल्या भ्रष्टाचारांमुळे NET परीक्षा रद्द केली होती त्याच धर्तीच्या आधारावर NEET ची परीक्षा व कायदा रद्द करून घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी नसीम खान यांनी आज मोर्चाच्या माध्यमातून केली.
महाराष्ट्र कॉँग्रेस तर्फे राज्यभरात सुरू असलेल्या चिखलफेक आंदोलनाच्या माध्यमातून नसीम खान म्हणाले की, आज प्रत्येक क्षेत्रात होत असलेला भ्रष्टाचार, वाढती महागाई, पेपर फूटी मुले विद्यार्थीचे होत असलेले नुकसान तसेच शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महतेला महायुती सरकारच जबाबदार आहे.
या मोर्चेत खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी आमदार मधू चव्हाण, बलदेव खोसा, अशोक जाधव, महाराष्ट्र कॉँग्रेस खजिनदार अमरजीत मनहास, मुंबई कॉँग्रेस उपाध्यक्ष भूषण पाटील, मुंबई कार्याध्यक्ष चरणसिंग संप्रा, रामगोविंद यादव यांच्या सह हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.