मुंबई / प्रतिनिधी : – लोकांच्या नागरी समस्या आणि मनपा मधील व्यापक भ्रष्टाचाराविरुद्ध माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्वाखाली उद्या मनपा एल विभाग कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
चांदिवली, कालिना आणि कुर्ला विधानसभा मतदार संघातील लोकाना महानगर पालिका तर्फे मिळत नसलेल्या नागरी सुविधा जसे की, रखडलेला कुर्ला अंधेरी रस्ता रुंदीकरण प्रकल्प, अर्धवट राहिलेला काजुपाडा पाईप लाईन रस्ता रुंदीकरण प्रकल्प, बिल्डर आणि नगरसेवकाच्या दबावाखाली कसाई वाडा कुरेश नगर ते नेहरू नगर येथील बंद करण्यात आलेला रस्ता, जागृती नगर ते कसाई वाडा कब्रस्तानकडे बंद केलेला रस्ता, विविध विभागात पाणी टंचाई, नादुरुस्त रस्ते, गटारे, चाळयामध्ये लादीकरण, ठीकठिकाणी पसरलेल्या कचऱ्यामुळे वाढत चाललेली रोगराई, मनपा शाळामधील अपुरा शिक्षक वर्ग व विद्यार्थ्याना येत असलेल्या अडचणी, दवाखान्यात मिळत नसलेले औषध, उपलब्ध नसलेले डॉक्टर, विविध ठिकाणी रस्त्यावर पसरलेला कचरा, दत्तक वस्तीच्या माध्यमातून होत असलेला भ्रष्टाचार, रस्त्यावर उत्पन्न खड्ड्यामुळे होत असलेले अपघात, भारत कोल कंपाऊंड कमानी कुर्ला येथील स्थानिक कामगाराना मनपच्या संगनमताने बेरोजगार करण्याचे षड्यंत्र, फेरिवाल्यावर होत असलेल्या नियमबाह्य कार्यवाह्या अशा आणि इतर अनेक मनपाशी संबंधित विभिन्न समस्याबाबत वारंवार तक्रार करूनही जनतेला न्याय मिळत नसल्याने त्रस्त झालेले नागरिक आणि त्यांच्या समस्या घेऊन थेट मनपा एल विभाग कार्यालयावर उत्तर मध्य मुंबई जिल्हा कॉँग्रेस तर्फे आणि माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्वाखाली जन-आक्रोश मोर्चा घेऊन अधिकाऱ्याना जाब विचारण्याकरिता हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे नसीम खान यांनी सांगितले.
आज सर्वोच्च न्यायालयाने कॉँग्रेस नेते श्री. राहुल गांधीजी यांच्या गुजरात न्यायालयाच्या निर्णयावर ताशोरे ओढत स्थगिती देण्याचा आदेश दिल्यामुळे हे सिद्ध झाले की, नफरत के खिलाफ…. मोहब्बत की जीत…. सत्यमेव जयते !
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करीत मिठाई वाटून जल्लोष साजरा करताना माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान