ॲड. सुशीबेन शाह यांनी दिव्यांग व्यक्तींना वाटल्या व्हीलचेअर
मुंबई – महिला व बालकांच्या समस्या सोडवणारी, अनाथ, विधवा व दिन दुबल्यांची बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह यांनी पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वरळी विधानसभेत दिव्यांग बालक व व्यक्तींना व्हीलचेअर वाटप केले.
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महिलांसाठी ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिलांनी त्याचा भरपूर आनंद घेतला. तसेच मोफत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, कृत्रिम अवयव वाटप नोंदणी असे अनेक कार्यक्रम दिवसभर विभागातील नागरिकांसाठी राबविण्यात आले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सदैव महिला भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून महिलांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबविली जात आहे. याचा सर्वाधिक महिलांनी लाभ घ्यावा. तसेच माझ्या वरळी विभागातील महिला, बालक, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्या सोडवणे हे माझे कर्तव्य आहे, असे भाष्य महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा व शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह यांनी केले.
याप्रसंगी, शिवसेना आमदार यामिनी जाधव, माजी नगरसेवक संतोष खरात, युवा नेता निखिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शिवसेना उपविभाग प्रमुख रेणुका तांबे, श्रीकांत जावळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.