ठाणे – येता-जाता अनेकजण आमच्यासोबत फोटो काढतात, फोटो काढताना कुणी कॅरेक्टर सर्टिफिकेट दाखवत नाही. कुणी फोटो काढला तर ती आमची चूक नाही. माझ्याकडेही एक फोटो आहे. हा गुन्हेगार किती गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे ही माहिती मनिषा कायंदे यांनी घ्यावी. असे फोटो दाखवायला लागलो तर फोटोंचा अल्बम तयार होईल. जो प्रश्न विचारलाय त्याचे उत्तर द्या, ड्रग्स कुठून येतायेत? कारण नसताना मुद्दे भरकटवण्यासाठी काहीही आरोप करायचे असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाडांनीशिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांना दिले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, चालता चालता उभं राहता मुलं फोटो काढतात, त्याला मी काय करू? फोटो काढणं बंद करू? फोटोमधील नाव अतिशय परिचयाचे आहे. हा इन्स्टाग्राम, युट्यूबमधील हिरो आहे. याची दहशत पूर्ण ठाणे जिल्ह्यात आहे. माझ्यासोबतचा कार्यकर्ता असेल त्याने उद्या रागात जाऊन २ मर्डर केले. त्यात माझा काय दोष? असे अनेक प्रकार चालतात, शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने साताऱ्यात फायरिंग केले, ३ जणांना मारले. कारण नसताना बोट दाखवण्याचा प्रयत्न करू नका. सुप्रियाताईंनी कुणाचे नाव घेतले नव्हते. एवढं मनाला लावू घेऊन नका. ड्रग्स घेणे चुकीचे आहे हे महाराष्ट्रात बोलणं चुकीचे असेल तर बोलायलाच नको असा टोलाही आव्हाडांनी लगावला.
तसेच मी आताही कुणाचे नाव घेतले नाही. फोटोवरून आरोप करणार असाल तर ठाण्यातील नगरसेवकांचे कुणाकुणाशी संबंध आहेत ते सगळ्या पोलिसांना माहिती आहे. विरोधी पक्षात आहे बोलणार, मंत्री सत्तेत असतात, पोलीस त्यांचे ऐकतात म्हणून विरोधी पक्ष आरोप करतात, ठाण्यातील पोलीस हवालदारही आमचे ऐकत नाही. पोलीस निष्क्रिय आहेत. ड्रग्समुळे एक पिढी बर्बाद होणार आहे. माझ्या बाजूला फोटो काढणारा असेल त्याचा धंदा काय हे विचारत बसू. मी हा फोटो दाखवला त्याचे बॅकग्राऊंड मनिषा कायंदेंनी शोधावं असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ड्रग्स प्रकरणी जे आरोपी असतील त्यांना जेलमध्ये टाका की परत बाहेर यायला नको. ललित पाटीलनं मी नावं सांगेन असं म्हणाला. पोलीस कोठडीत त्याचा जबाब नोंदवतील. काही नावे पुढे येणार नाहीत. हे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार नाही. आरोप झाल्यावर राजीनामे द्या. हे वॉशिंग मशिनचे सरकार आहे. एखाद्याने बाजूला येऊन फोटो काढला तर काय करणार. आमचा तर चालता चालता फोटो आहे. मी जो फोटो दाखवतो तो उघड आहे. कुणीही कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन फोटो काढत नाही. मुंब्रात हजारो कार्यकर्ते आहेत. प्रत्येकजण फोटो काढतो. माझ्यासोबत आज आहे, उद्या कुणाचा मर्डर केला तर मी काय करू? असा सवालही जितेंद्र आव्हाडांनी मनिषा कायंदे यांना विचारला.
Thanks with Lokmat